टेम्पोमधून नेण्यात येणार ऍसिड पडल्यानं 6 जखमी

January 25, 2011 11:43 AM0 commentsViews: 1

25 जानेवारी

टेम्पोमधून नेत असलेलं ऍसिडचं खोकं पडून त्यामधलं ऍसिड उडाल्यानं 6 जण जखमी झाले आहेत. पुण्यातल्या सातारा रोडच्या शंकर महाराज मठाजवळ आज सकाळी ही घटना घडली आहे. ऍसिडची भरलेली खोकी घेउन टेम्पो स्वारगेटकडे येत असताना ही घटना घडली आहे. टेम्पोमधून ऍसिडच्या बाटल्यांचं एक खोकं खाली पडलं. त्यामधलं ऍसिड मागून येणार्‍या गाड्यांवर उडालं. त्यामध्ये एकुण 6 लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतलं आहे.

close