डॉ. सेन यांची पत्नी एलिनावर नागपूरमध्ये गुन्हा दाखल

January 25, 2011 3:53 PM0 commentsViews: 3

25 जानेवारी

छत्तीसगडच्या बिलासपूर हायकोर्टात आज बिनायक सेन यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली सध्या ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या दरम्यान त्यांच्या पत्नी एलिना सेन यांच्यावर वर्धा इथल्या सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये काल गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यात एलिना सेन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशविदेशातले पाहुणे आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती पोलिसांना न दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. नागपूर एटीएसनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. महिलांच्या राष्ट्रीय परिषदेत देशविदेशातले अनेक अभ्यासक सहभागी झाले होते. यामध्ये परदेशी अभ्यासकही सहभागी झाले होते.

close