रत्नागिरीत नाट्य संमेलनाची तयारी जोरात सुरू

January 25, 2011 4:03 PM0 commentsViews: 4

25 जानेवारी

91 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची तयारी आता रत्नागिरीत जोरात सुरू झाली. रत्नागिरीतील या नाटयसंमेलनासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात लोकमान्य टिळक नगरी उभारण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. रत्नागिरी शहरातील नागरिकांमध्ये सुध्दा या नाट्यसंमेलनाबाबत बरीच उत्सुकता आहे. शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर आणि चौकात या नाट्यसंमेलनाला भरघोस प्रतिसाद देण्याबाबत होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल संमेलनाच्या काळात असणार आहे. नाट्यसंमेलनाचं उद्घाटन 29 जानेवारीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी या नाट्यसंमेलनाला हजेरी लावण्यासाठी नाट्यकलाकार आणि नाट्यरसिक रत्नागिरीत यायला सुरवात झाली. नाट्यसंमेलनाचा समारोप 30 जानेवारीला होणार आहे. 28 तारखेला रत्नागिरी शहरात भव्य नाट्यदिंडीचे आयोजन करण्यात आलं आहे.

close