पुण्यात युवा मतदार दिन साजरा

January 25, 2011 4:05 PM0 commentsViews: 7

25 जानेवारी

25 जानेवारी हा दिवस युवा मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज यानिमित्त पुण्यामध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जागृती व्हावी यासाठी तरुण तरुणींना पुण्याचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. यानंतर मतदानाचा हक्क आणि नियमांविषयी तरुणांना मार्गदर्शनही करण्यात आलं. मतदानाचा हक्क बजावणारचं असा विश्वास यावेळी मुलांनी व्यक्त केला.

close