पुण्यामध्ये विवाह परिषदेचं आयोजन

January 25, 2011 4:09 PM0 commentsViews: 4

25 जानेवारी

लग्नसंस्था हा आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग यामध्ये पारंपारिक पद्धतीने होणार्‍या लग्नापासून ते अगदी लिव्ह इन रिलेशनशीप पर्यंत अनेक प्रवाह पहायला मिळता. या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी पुण्यामध्ये नुकतंच विवाह परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातल्या निवारा वृद्धाश्रमाच्या ऑडिटोरियममध्ये तरुण मुलं मुली आणि त्यांच्या पालकांची गर्दी झाली होती. निमित्त होतं साथ साथ विवाह संस्था आणि मिळून सार्‍याजणी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विवाह परिषदेचं. सहजीवन म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळेस नेहमीच्या पठडीपेक्षा अनेक अनुभव ऐकायला मिळाले. यात अगदी आंतरधर्मीय लग्नापासून ते लग्न करता सिंगल पॅरेंटींग करणार्‍यांनी मनोगत व्यक्त केलं.एकीकडे लग्न संस्थेकडे बघायचा हल्लीच्या मुलांचा दृष्टीकोन बदलतोय. तर दुसरीकडे घटस्फोटांचं प्रमाणही वाढतं आहे. अशा वेळेस सहजीवनाचा नेमका अर्थ समजून घ्यायला या विवाह परिषदेची नक्कीच मदत झाली.

close