मुंबईत 1 कोटी किमतीचं ड्रग्ज जप्त

January 25, 2011 4:11 PM0 commentsViews: 6

25 जानेवारी

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने अंधेरी येथे छापा टाकून 37 किलो इफि-ड्रीन ड्रग्ज जप्त केलं आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारतील किंमत सुमारे एक कोटी 20 लाख रुपये आहे. पोलिसांनी अंधेरी येथे हॉटेल स्टेईन इथं टाकलेल्या धाडीत ड्रग्जसह दोघांना अटक करण्यात आली. शाहूल सादिक आणि गणेश कुमार सुबय्या अशी दोघांची नावं असून ते चेन्नईचे आहेत. चहाच्या किटलीतून या इफिड्रिनचं परदेशात स्मगलिंग केले जात असल्याचे उघड झालं. हे अमंली पदार्थ ते बँकॉक मलेशिया येथे स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवयाचे. त्यांना मुंबईतून पुरवठा होत होता. गेल्या सात महिन्या पासून त्यांनी अंधेरी येथे अड्डा बनवला होता.

या दोघाकडून 10 स्टिलच्या थर्मास, 3 पासपोर्ट , काही रक्कम जप्त करण्याती आली आहे. हे अमंली पदार्थ ते बँकॉक मलेशिया येथे स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवयाचे. त्यांना मुंबईतून पुरवठा होत होता. गेल्या सात महिन्यापासून त्यांनी अंधेरी येथे अड्डा बनवला होता. यापूर्वी त्यांनी सफोला तेलाच्या पिशवीतून, इडली पावडर रुपाने इफि-ड्रीन परदेशात पाठवलं होतं. यानंतर आता त्यांना चहाच्या किटलीतून पाठवण्याची शक्कल लढवली होती. या दोघांचा आणखी एक साथीदार आहे. त्याचं नावं डॉमनिक आहे. त्याला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे.या दोघांना मुंबईत कोण पुरवठा करायचं याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

close