ग्रॅहम स्टेन्स हत्याप्रकरणाच्या निकालपत्रातला वादग्रस्त भाग कोर्टानं वगळला

January 25, 2011 4:38 PM0 commentsViews: 3

25 जानेवारी

भारतीय न्यायसंस्थेच्या इतिहासात एक दुर्मिळ घटना घडली. ओरिसातल्या फादर ग्रॅहम स्टेन्स हत्याकांडाच्या निकालपत्रातले दोन मुद्दे सुप्रीम कोर्टानं काढून टाकले. ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मारेकरी दारासिंगची जन्मठेपेची शिक्षा कोर्टानं गेल्या शुक्रवारी कायम ठेवली होती. पण तसं करताना कोर्टानं त्यांच्या भूमिकेबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. बळजबरीनं धर्मांतर करणं चुकीचं असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. कोर्टाच्या या निरीक्षणावर मीडिया, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत यांच्याकडून तीव्र प्रक्रिया उमटल्या. सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण वगळावे अशी मागणीही झाली. आता सुप्रीम कोर्टानं निकालपत्रातून हे निरीक्षण काढून टाकलं. पण आरोपी दारासिंगच्या जन्मठेपेच्या शिक्षेत वाढ करायला नकार दिला. ही घटना दुर्मिळातली दुर्मिळ नसल्याचं कोर्टानं म्हटलं होतं.

close