सोनवणेंच्या कुटुंबियांना सरकारतर्फे 25 लाखांची मदत

January 25, 2011 5:07 PM0 commentsViews: 3

25 जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या फक्त एक दिवस अगोदर लोकशाहीला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये घडली. नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोलच्या भेसळखोर माफियांनी जिवंत जाळलं. या घटनेत अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कचरु सरवणकर, पोपट शिंदे आणि राजू शिरसाट या तिघांना अटक करण्यात आली आहेत. यशवंत सोनवणेंच्या अश्याप्रकारे अचानक जाण्यानं त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली. सोनवणे यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुलं आहेत. यापैकी एक मुलगा 9 तर दुसरा 11 वर्षांचा आहे.

दरम्यान सोनवणे यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहेत. सोनवणेंच्या कुटुंबियांना सरकारतर्फे 25 लाखांची मदत केली जाणार आहे. त्याशिवाय एक घरही दिलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. आणि याचबरोबर सोनवणे यांच्या निवृत्ती वयापर्यंत त्यांच्या पत्नीला संपूर्ण पगार दिला जाणार आहे. तसेच कुटंुबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाणार आहे. दोषींकर कडक कारवाईचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

close