आमदारानं धमकी दिल्याचा बीडच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांचा आरोप

January 25, 2011 5:36 PM0 commentsViews: 3

25 जानेवारी

नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवतं सोनवणे यांना जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर आता अधिकार्‍यांना दमदाटी केल्याच्या तक्रारीही बाहेर येऊ लागल्या आहेत. बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरूण उन्हाळे यांनी मलादेखील एका आमदारानं माझं काम कसं करीत नाहीस. तुझ्याकडं बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप केला. बीड इथं राजपत्रित अधिका-यांच्या निषेध सभेत पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर त्यांनी या आरोप केला. आठ दिवसांपूर्वीची ही घटना आहे. तर ही बाब गंभीर असून चौकशीनंतर संबंधित आमदार दोषी आढळल्यास कारवाई करु असं आश्वासन क्षीरसागर यांनी दिलं.

close