देशभरात 61 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2011 8:51 AM0 commentsViews: 6

26 जानेवारी

आज 26 जानेवारी. भारताचा प्रजासत्ताक दिन. राजपथावर आज दिमाखदार संचलन झालं. 61 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतानं स्वत:ची अशी एक राज्यघटना निर्माण केली. आणि लोकांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली.आज झालेल्या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष डॉ. हाजी सुसिलो बामबाग युधो-योनो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. विविध संकल्पनांवर आधारित चित्ररथांना चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या चित्ररथात यावेळी लावणीचा समावेश करण्यात आला होता.

close