चित्ररथात मराठमोळी लावणी

January 26, 2011 9:11 AM0 commentsViews: 20

26 जानेवारी

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिम्मित राजपथावर आज दिमाखदार संचलन पार पडलं. या सोहळ्यात चित्ररथांमध्ये मर्‍हाटमोळ्या लावणीनं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं. महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये लावणीनं आपला ठसका दाखवला. सोनिया परचुरे यांनी या लावणीचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. राजपथावर महाराष्ट्राच्या लोककलेच्या संपन्न परंपरेचं दर्शन या लावणीनं घडवलं. तसेच या संचलनात देशभरातल्या संस्कृतीचं दर्शन घडलं. प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य सांगणारे चित्ररथ या संचलनात होते.

close