नागपूरच्या नाग नदी वाचवण्यासाठी पेन्टींग्स्‌द्वारे प्रयत्न

January 26, 2011 10:50 AM0 commentsViews: 5

26 जानेवारी

प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काही तरी करायचा प्रयत्न करताना दिसत आहे. नागपूरच्या काही स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन असाच एक प्रयत्न करताना दिसत आहेत. सुमारे 250 वर्षांचा इतिहास असणार्‍या आणि नागपूरची ओळख असलेल्या नाग नदीचं रुपांतर सध्या नाल्यात झालं आहे. याचं प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या स्वयंसेवी संस्था नाग नदीच्या भिंतीवर पेन्टींग काढून आपला संदेश सरकारपर्यंत पोहचवत आहेत. इथं साफसफाई करून या नदीला पुन्हा जिवंत केलं जावं अशी भावना स्वयंसेवकांनी आपल्या पेन्टींग्स्‌द्वारे व्यक्त केली.

close