सोनवणे जळीतकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी – प्रकाश आंबेडकर

January 26, 2011 11:04 AM0 commentsViews: 5

26 जानेवारी

नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीतकांडाचा तपास डीवायएसपी समाधान पवार यांच्याकडं सोपवण्यात आला. नाशिकचे आयजी उद्धव कांबळे यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणातला मुख्य आरोपी पोपट शिंदेला मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आलं. आरोपी पोपट शिंदे गंभीररित्या भाजला गेला. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणातले 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर 3 आरोपी फरार आहेत. दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

close