मुंबईच्या लोकलमध्ये पाहता येणार ‘एलसीडी टीव्ही ‘!

January 26, 2011 11:15 AM0 commentsViews: 2

26 जानेवारी

मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी. मुंबईतल्या सेंट्रल आणि हार्बर लाईन लोकल ट्रेनमध्ये एलसीडी टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. एका डब्यामध्ये दोन अशा प्रकारे हे एलसीडी डब्यांमध्ये लावण्यात आले आहेत. या एलसीडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येतीलच पण त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर त्याची माहिती प्रवाशांना देण्यात येईल. या योजनेमुळे मध्य रेल्वेला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त होतं आहे.

close