शेवटच्या टेस्टसाठी दोन्ही टीम नागपूर पोहचल्या

November 3, 2008 5:41 PM0 commentsViews: 4

03 नोव्हेंबर नागपूर,भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणा-या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी दोन्ही टीम आज नागपूरमध्ये पोहचल्या. नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर येत्या सहा तारखेपासून टेस्ट मॅचची सुरुवात होईल. चार मॅचच्या या सिरीजमध्ये भारतानं एक मॅच जिंकून याआधीच आघाडी घेतलीय. त्यामुळे सिरिज जिंकायची असेल तरी भारताला नागपूर टेस्ट ड्रॉ ठेवावी लागेल किंवा जिंकावी लागेल. तर ऑस्ट्रेलिया ही टेस्ट जिंकून सिरीज ड्रॉ करण्याच्या प्रयत्नात असेल.

close