नागपूरच्या शाळेत प्रार्थनेनंतर राज्यघटनेचं वाचन

January 26, 2011 12:05 PM0 commentsViews:

26 जानेवारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेलं संविधान म्हणजेच राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. मात्र सर्वसामान्यांना संविधानाबद्दल पुरेशी माहिती नसते. मात्र नागपूरमध्ये एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यामंध्ये संविधानाबद्दल सजगता वाढली आहे.

नागपूर शहरातल्या जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थी गेल्या पाच वर्षापासून दररोज प्रार्थनेनंतर नियमितपणे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं जातं. त्यामुळे संविधानाची मुलभूत तत्वं या विद्यार्थ्यांना उमजायला लागली. विशेष म्हणजे नागपूर जिल्हा परिषदेच्या 3 हजार शाळांमधून दररोज संविधानाचं वाचन करण्यात येतं. प्रास्तविकाच्या वाचनाबरोबरच विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल अधिक माहिती देण्यात येते. यासाठी अनेक शिक्षकांनी पुढाकार घेतला. 2005 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला. या संकल्पनेला आता चांगलीच गती मिळाली आहे.

close