भेसळ माफियांचं रॅकेट उध्वस्त केल जाईल – मुख्यमंत्री

January 26, 2011 2:08 PM0 commentsViews: 4

26 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल आणि भेसळ माफियांचं रॅकेट उध्वस्त केल जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच आरटीआय कार्यकर्ते असोत किंवा कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी असतील असं कुणीही संरक्षण मागितलं तर त्यांना संरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्याचबरोबर एखाद्या सरकारी कर्मचार्‍याने एखाद्या घोटाळ्याची माहिती दिली तर त्याचे नाव उघड न होऊ देता दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची तरतूद कायद्याद्वारे करण्यात येणार आहे. यासंबंधीचं व्हीसल ब्लोअर विधेयक येत्या अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

close