मार्कस्वादी कम्युनिस्ट पक्षाचा पुण्यात मोर्चा

January 26, 2011 1:36 PM0 commentsViews:

26 जानेवारी

मनमाडजवळ भेसळखोरांनी निर्घृणपणे अप्पर जिल्हाधिकार्‍यांना जाळल्याचे पडसाद सगळीकडं उमटत आहे. पुण्यात मार्कस्वादी कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर मोर्चा काढण्यात आला. नारायण पेठेतील पक्षाच्या कार्यालयापासून फरासखान्यातील हुतात्मा पुतळ्यापर्यंत माफीयाराज विरोधात घोषणा देण्यात आल्या. एकीकडे रेशनवरील गरीबांकरता असलेलं रॉकेल पळवायचे तर दुसरीकडे भेसळीला विरोध करणार्‍या कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकार्‍याला जाळायचं अशा भयंकर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी पदावरून पायउतार व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.

close