आरोपींना भर चौकात फाशी द्यावी – अण्णा हजारे

January 26, 2011 4:22 PM0 commentsViews:

26 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी कायद्यात बदल करुन आरोपींना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. ते आज अहमदनगरमध्ये बोलत होते. सोनवणे जळीत प्रकरण हे अत्यंत दुदैर्वी असून माणुसकीला काळीमा फासणारं आहे असंही ते यावेळी म्हणाले. भेसळ प्रकरणात सरकारने कठोर कायदे न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन पुकारणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. याप्रकरणी संबंधित खात्यांचीही चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली.

close