पद्मश्री पुरस्कार हा माझ्या आदिवासी समाजाचा गौरव – जिव्या म्हसे

January 26, 2011 3:54 PM0 commentsViews: 2

26 जानेवारी

इंदिरा गांधींच्या काळात केंद्र सरकारने आपल्याला बक्षीस म्हणून जाहीर केलेली साडे तीन एकर जमीन हस्तांतरीत केली तर त्या ठिकाणी आदिवासी आणि वारली चित्रकलेसाठी म्युझियम उभारणार अशी इच्छा पद्मश्री पुरस्काराचे मानकरी जिव्या म्हसे यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू जवळच्या गंजाड गावातल्या कुलबी पाड्यात एका लहानशा घरात जिव्या म्हसे आपल्या कुटुंबासोबत राहतात. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यापासून त्यांना अभिनंदन करणार्‍यांची घरी रांगच लागली. हा पुरस्कार जाहीर झाल्याचा मला खूप आनंद झाला. आणि हा गौरव केवळ माझाच नाही तर माझ्या आदिवासी समाजाचा गौरव आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं.

close