बारच्या विरोधात 80 परिवारांचं आंदोलन

January 26, 2011 4:05 PM0 commentsViews: 3

26 जानेवारी

एकीकडे सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे आपल्या सोसायटीला बारमुक्त करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याची वेळ अंबरनाथमधल्या नागरिकांवर आली. अंबरनाथमधल्या नवरे सोसायटीतल्या सुमारे 80 कुटुंबानी बार विरोधात आंदोलन सुरु केलं. या सोसायटीतल्या रहिवाशांनी तोंडाला काळी फीत बांधून आंदोलनाला सुरवात केली. या सोसायटी शेजारी असलेल्या शगुन बार विरोधात इथले नागरिक गेली 3 वर्ष लढा देत आहेत.मात्र राजकीय वरदहस्तापोटी या बारवर कारवाई होत नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला.

close