सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी 3 आरोपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

January 27, 2011 10:53 AM0 commentsViews: 2

27 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी बुधवारी पोलिसांनी सर्व 11 आरोपींना अटक केली आहे. या पैकी 3 आरोपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदेचा मुलगा कुणाल शिंदे हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला नाशिकच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. तर ज्या टँकरमध्ये भेसळ सुरू होती त्या टँकरचा ड्रायव्हर, क्लिनर या दोघांना अटक करण्यात आली. ड्रायव्हर इम्रान खान आणि क्लिनर हक्कानी खान अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान या प्रकरणातला मुख्य आरोपी पोपट शिंदेला मुंबईतल्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. आरोपी शिंदे गंभीर-रित्या भाजला गेला. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणातल्या 3 आरोपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

close