कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला झुकतं माप

November 3, 2008 5:58 PM0 commentsViews: 1

3 नोव्हेंबर, कर्नाटक कर्नाटकातील विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारानं विजय मिळवल्यानं येणार्‍या विधानसभा पोटनिवडणुकीत सत्तेत असणार्‍या भाजपाचा रस्ता सहज झाला आहे. बेळगावात शशिकांत नाईक, धारवाडमध्ये शिवराज सज्जनवार आणि कोडागुमध्ये एस. जी. मेडप्पा यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत केलं. या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर कर्नाटकात 18 नोव्हेंबरला होणार्‍या 7 मतदार संघातल्या विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे. तसंच इथे सुद्धा भाजपच्या विजयाचा रस्ता सरळ झाला आहे. या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस जरी आपल्या विजयाचा दावा करत असली तरी भाजपच्या विजयाने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाने काँग्रेसशी युती केली तर भाजपाला विजय कठीण होणार आहे, नाही तर कर्नाटकात भाजपाची घोडदौड रोखनं काँग्रेसला कठीण होणार आहे.

close