पेस आणि भूपती जोडीची ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये धडक

January 27, 2011 11:20 AM0 commentsViews: 3

27 जानेवारीइंडियन एक्सप्रेस लिअँडर पेस आणि महेश भूपती जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची दोघांची पहिलीच वेळ आहे.पेस भूपती जोडीनं डॅनिअल नेस्टर आणि मॅक्स मिर्नी या दुसर्‍या सिडेड जोडीला तीन सेटमध्ये हरवलं. पहिल्या सेटमध्येच चांगली लढत बघायला मिळाली. हा सेट टायब्रेकरवर गेला. आणि तिथंही अटीतटीच्या झुंजीनंतर भारतीय जोडीने तो जिंकला. दुसरा सेट नेस्टर आणि मिर्नी यांनी 6-4 ने जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये मात्र पेस आणि भूपतीने प्रतिस्पर्ध्यांना फारशी संधी दिली नाही. सुरुवातीलाच त्यांनी 5-2ने आघाडी घेतली. आणि महेश भूपतीने एका अप्रतिम शॉटवर मॅच संपवली. आता फायनलमध्ये त्यांची गाठ अव्वल सिडेड ब्रायन बंधूंशी पडणार आहे.

close