जेएनपीटीच्या कार्यालयाला टाळे ठोकले !

January 27, 2011 11:55 AM0 commentsViews: 3

27 जानेवारी

ग्रामपंचायतींचा 130 कोटींचा टॅक्स थकवल्याप्रकरणी मंुबईतील उरणजवळच्या जेएनपीटीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय या ग्रामपंचायतींनी घेतला आहे. 1984 पासून थकीत प्रॉपर्टी टॅक्सचा भरणा जेएनपीटी करत नव्हती. याबाबत 11 ग्रामपंचायतींनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनंतरही जेएनपीटीने फक्त 10 कोटी रुपये प्रॉपर्टी टॅक्सचा भरणा केला होता मात्र उर्वरीत रक्कमेचा भरणा न केल्यानं अखेर आज जे.एन.पी.टी.च्या मुख्यालयाला टाळे ठोकण्यात येणार आहे.

दरम्यान जेएनपीटीच्या कार्यालयातील सर्व सामान जप्त करण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टानं जेएनपीटीला पैसे भरायला सांगीतले होते.मात्र तरीही पैसे न भरल्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली.

close