अमित शहा यांचा जामीन रद्द करावा सीबीआयची मागणी

January 27, 2011 12:27 PM0 commentsViews: 3

27 जानेवारीगुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शहा यांचा जामीन रद्द करायचा की नाही याबाबत सुप्रीम कोर्ट आज निर्णय घेणार आहे. सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी शहा आरोपी आहेत. पण गुजरात हायकोर्टानं त्यांना जामीन दिला. नोव्हेंबर 2010 मध्ये जामीन देण्यात आला. पण शहा बाहेर असल्यानं साक्षीदारांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी याचिका सीबीआयनं सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यावर आज निर्णय घेण्यात येणार आहे.

close