पी. जे. थॉमस आरोपी असल्याचं पंतप्रधानांना माहित नव्हते – ऍटोर्नी जनरल

January 27, 2011 12:43 PM0 commentsViews: 1

27 जानेवारी

मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस पाम ऑईल घोटाळ्यात आरोपी असल्याचे पंतप्रधानांना माहिती नसल्याचे ऍटोर्नी जनरल यांनी न्यालायात सांगितलं. थॉमस यांच्या नियुक्तीला आव्हान देणार्‍या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केरळमधल्या पामोलिन घोटाळ्यात थॉमस यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यांना पदावरुन का काढण्यात येऊ नये अशी याचिका न्यायालयात दाखल आहे. त्यावर आज सुनावणी सुरु आहे. पण पंतप्रधानांना याबाबत माहिती नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यावर भ्रष्टाचारी व्यक्ती दक्षता आयोगाचं काम कसं करु शकते असा सवाल न्यायालयानं केला आहे.

close