राज्यभरात 173 भेसळखोर ताब्यात

January 27, 2011 2:52 PM0 commentsViews: 1

27 जानेवारी

नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना तेल भेसळखोरांनी यांची हत्या केल्यानंतर सरकारला आता जाग आली. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक ही करण्यात आली आहे. तर राज्यभरात चंद्रपूर, वर्धा, नागपूर ग्रामीण,अलिबाग, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिकमध्ये भेसळखोरांवर छापे घालण्यात आले आहेत. तर परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात 3 ठिकाणी भेसळखोरंावर पोलिसांनी छापे टाकलेत. यात 3 जणांना अटक करण्यात आली तर 1000 लिटर रॉकेल जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी राज्यभरातून कालबुधवारपासून पोलिसांनी जवळपास 173 जणांना ताब्यात घेतलं. यात 81 वाळू माफियांना अटक करण्यात आली. तर 78 तेलमाफियांना अटक करण्यात आली. तर या प्रकरणात 40 लाख रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. इतकचं नाही तर दुधात भेसळ करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली. या सगळ्यांवर भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे…

close