ईडन गार्डनवर होणारी मॅच रद्द !

January 27, 2011 2:56 PM0 commentsViews: 61

27 जानेवारी

यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होत आहे. पण आयोजनाला एक जोरदार धक्का बसला. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर 27 फेब्रुवारीला भारत आणि इंग्लंड दरम्यान होणारी मॅच तिथून हलवण्यात आली आहे. ही मॅच आता बंगळुरुला होईल. आयसीसीच्या पिच कमिटीने याच आठवड्यात ईडन गार्डन मैदानाची पाहणी केली होती. आणि तिथल्या तयारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी स्टेडिअमच्या नुतनीकरणाचं काम हातात घेतलं होतं. आणि ते वेळेवर पूर्ण झालेलं नाही.

तर स्टेडिअम 5 फेब्रुवारी पूर्वी तयार होईल असा दावा बंगाल असोसिएशनने केला होता. पण तेच आता 26 तारखेपर्यंत काम चालेल असं सांगत आहेत. त्यामुळे आयसीसीने मॅच हलवण्याचा निर्णय घेतला. ईडन गार्डन हे भारतातलं सगळ्यात मोठं स्टेडिअम आहे. आणि इथं 1987 ची फायनल आणि 96 ची सेमी फायनल मॅच झाली.

close