जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी जाहीर सत्कार

January 27, 2011 3:06 PM0 commentsViews: 5

27 जानेवारी

जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांचा क्रीडा पत्रकारीतेतील 30 वर्षांच्या योगदानासाठी जाहीर सत्कार करण्यात आला . भारताचा माजी कॅप्टन धनराज पिल्ले याच्या हस्ते सुहास जोशी यांना यावेळी 5 लाख रुपये देण्यात आले. मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघटना आणि अस्तित्व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते सुहास जोशी गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आलं. साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर क्रिकेट कॉमेंटेटर सुरेश सरैय्या, ज्येष्ट क्रीडा पत्रकार वि.वि करमरकर, मुकुंद कर्णिक आणि अस्तित्व संंस्कार प्रबोधिनीचे अध्यक्ष तानाजी साळेकर उपस्थित होते.

close