सीबीआय चौकशी करावी – विजया सोनवणे

January 27, 2011 4:31 PM0 commentsViews: 1

27 जानेवारी

नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे जळीत हत्याकांड प्रकरणी आता पर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी तीन आरोपींना 13 दिवसांची पोलिस कोठडी ही देण्यात आली. सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी आज गुरूवारी राज्यभरात सरकारी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं. आरोपींबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतेय. तर यशवंत सोनवणेंच्या हत्येची सीबीआय चौकशी करा अशी मागणी यशवंत सोनवणेंच्या पत्नी विजया सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपींवर मोक्का लावता येईल का याचाही विचार केला जात असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलं.

close