अधिकार्‍यांच्या संगनमतानेच भेसळीचे प्रकार घडतात – मुख्यमंत्री

January 27, 2011 6:29 PM0 commentsViews: 7

27 जानेवारी

सोनवणे जळीतहत्याकांड प्रकरणानंतर शासनाने भेसळखोरांविरोध कारवाई सुरू केली. तर तेल कंपनीच्या अधिकार्‍यांच्या संगनमतानेच तेल भेसळीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. राज्यभर यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. त्याबरोबर राहुल गांधी सध्या महाराष्ट्र्‌ाच्या दौर्‍यावर आहेत. राहुल गांधीसोबत उस्मानाबाद इथे मुख्यमंत्री आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी हा आरोप दिला. पेट्रोलियम खात्यातही अपहार होतो असंही ते म्हणाले.

close