माजी मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत गुंड-माफियाची तडिपारी रद्द – आंबेडकर

January 27, 2011 4:40 PM0 commentsViews: 12

27 जानेवारी

विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत नाशिक जिल्ह्यातील अनेक गुंड-माफियांची तडिपारी रद्द करण्यात आली असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांचे माफियांशी लागेबांधे नसल्यानं त्यांनी जमीन, वाळू आणि तेल माफियांचं साम्राज्य मोडून काढावं अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

close