शिफारस करुन मिळणारे पुरस्कार हे पुरस्कारच नसता -नाना

January 27, 2011 6:27 PM0 commentsViews:

27 जानेवारी

शिफारस करुन मिळणारे पुरस्कार हे पुरस्कारच नाहीत असं मत अभिनेता नाना पाटेकर याने व्यक्त केलं. असे पुरस्कार हे फक्त कपाटं सजवण्यासाठी असतात असंही तो यावेळी म्हणाला.अर्थातच त्याचा रोख होता तो पद्म पुरस्कार आणि फिल्म अवॉर्ड्स कडे. फिल्म पुरस्कार मिळण्यासाठी लॉबिंगही करावं लागतं. मग तो कसा तुमचा सन्मान असंही तो यावेळी म्हणाला.

close