वाळू तस्करांचा तलाठ्यावर हल्ला

January 28, 2011 9:27 AM0 commentsViews: 12

28 जानेवारी

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शिरगाव इथं शिरगाव – हातनोली रस्त्यावर वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेले तलाठी श्रीनिवास पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. उमाजी यरमाळ, बालाजी यरमाळ आणि विकास चव्हाण अशी त्यांची नाव आहेत. तासगावमध्ये तलाठ्याला या वाळू माफियांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिरगाव-हातनोली रस्त्यावर वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या श्रीनिवास पाटील यांच्यावर हल्ला झाला. तिघांनी दगडफेक करून तलाठी पाटील आणि सहाकार्‍यांना तिथून पिटाळून लावलं. हा ट्रॅक्टर उमाजी पंढरीनाथ यरमाळ याच्या मालकीचा आहे. तसेच यरमाळ राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय. खुद्द गृहमंत्र्यांच्या तालुक्यात ही घटना घडल्यानं वाळू माफियांचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला. तर तलाठी श्रीनिवास पाटील यांनी याविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिलं आहे. दरम्यान याप्रकरणाची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे ओदश जिल्हाधिकार्‍यांनी पोलिसांनी दिले आहेत.

close