दलित आणि अल्पसंख्याक समाजात मोठा नेता नाही – राहुल गांधी

January 28, 2011 9:46 AM0 commentsViews: 4

28 जानेवारी

महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज उस्मानाबादमध्ये अल्पसंख्याक आणि दलित युवकांशी संवाद साधला. समाजातल्या सर्वच थरातल्या युवकांनी राजकारणात आलं पाहिजे असं ते म्हणाले. आज दलित आणि अल्पसंख्याक समाजात मोठा नेता नाही. आता युवकांनी युथ काँग्रेसच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढली पाहिजे असं आवाहन त्यांनी युवकांना केलं. तर काँग्रेसमध्ये यापुढे घराणेशाहीला थारा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान राहुल गांधी आज अहमदनगरच्या दौर्‍यावर आहेत. साई संस्थानच्या हेलिपॅडवर तीन वाजता त्यांचं चॉपर उतरणार आहे. साईबाबांचं दर्शन घेतल्यावर ते राहता गावातील सेंट जॉर्ज स्कूल इथल्या युवकांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम युवक काँग्रेसनं आयोजित केला. राहुल गांधीच्या दौर्‍यामुळे शिर्डीत सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

close