सोलापूरमध्ये तेल माफियांची टोळी जेरबंद

January 28, 2011 9:55 AM0 commentsViews: 2

28 जानेवारी

आज दुसर्‍या दिवशीही माफियांविरोधातलं धाडसत्र सुरुच आहे. काल गुरूवार रात्रीपासून अहमदनगर, बार्शी, अकोला याठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी राज्यभरातून कालपासून पोलिसांनी अंदाजे 200 जणांना ताब्यात घेतलं. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहरात बनावट ऑईल तयार करण्याचा धंदा सुरु होता. याठिकाणी पोलिसांनी काल धाड टाकून 4 जणांच्या टोळीला अटक केली. या छाप्यात दहा लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं. टोळीचा म्होरक्या चैतन्य कुलकर्णीचा शोध सुरु आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पेट्रोल भेसळ प्रकरणी एकूण 40 जणांना ताब्यात घेण्यात आलं.

close