निळ्या रॉकेलची बेकायदेशीर विक्री करताना 3 जणांना रंगेहात पकडलं

January 28, 2011 9:58 AM0 commentsViews: 1

28 जानेवारी

अहमदनगर जिल्ह्यातल्या बाभूळगाव इथल्या धाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेन छापा टाकला. या छाप्यात निळ्या रॉकेलची बेकायदेशीर विक्री करताना तीनजणांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. तसेच 25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी भेसळयुक्त तेल ट्रक चालकांना इंधन म्हणून विकण्यात येत होतं. ही कारवाई अजूनही सुरु आहे. गुरुनानक ढाब्यावर छापा टाकण्यात आला. यात 8 आरोपी आणि 25 लाखाची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तर अकोल्यातही पोलिसांनी छापासत्र सुरु केलं. या छाप्यात 1200 लिटर रॉकेल, 500 लिटर नाफ्ता आणि रॉकेल भेसळीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त केलं आहे. तसेच 3 जणांना अटक करण्यात आली.

close