भीमा नदीच्या पात्रातून राजरोसपणे वाळू उपसा

January 28, 2011 10:05 AM0 commentsViews: 8

28 जानेवारीपंढरपूर परिसरातल्या भीमा नदीच्या पात्रातून राजरोसपणे वाळू उपसा सुरु आहे. जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरण,शेती आणि रस्त्यांची दुरवस्था झाली. मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर इथं तर वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपसा करताना कायद्याचे उल्लंघन करण्यात येतं. लतिफ तांबोळी या ठेकेदाराला एक कोटी 69 लाख रुपयांना वाळू उपशाचा ठेका देण्यात आला. पण त्यानं अतिरिक्त उपसा सुरु केला. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला. जवळपास 500 ट्रक या परिसरात वाळू उपशासाठी वापरण्यात येत आहे.

close