सरकारचीच राखरांगोळी झाली – उद्धव ठाकरे

January 28, 2011 10:21 AM0 commentsViews: 1

28 जानेवारी

नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. जळीत हत्याकांड म्हणजे सरकारचीच राख झाल्याचा प्रकार आहे असं उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच तेल माफिया हे कृत्य करत असेल तर सरकारचा दाब यावर राहिला नाही आहे त्यामुळे जनतेनच उठाव करावा आणि सरकारला खुर्चीवरून दूर केलं पाहिजे . जर सरकारला या तेल माफियांची माहिती होती तर सोनवणेंची हत्या होईपर्यंत वाट का पाहण्यात आली आणि माफियांविरूध्द कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल ही उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला.

close