आयबीएन लोकमतनं दाखवलेले फुटेज पुरावा म्हणून सादर करू – गृहमंत्री

January 28, 2011 10:35 AM0 commentsViews: 5

28 जानेवारी

मनमाडमधल्या पेट्रोल माफियाचं आयबीएन लोकमतनं दाखवलेले व्हिडिओ फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर करू अशी माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली. अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्याकांडानंतर तेलमाफियांचं रॅकेट उघडकीस आलं. या घटनेतला मुख्य आरोपी पोपट शिंदेच्या ढाब्यावर कशी चालते भेसळ ते दाखवणारा हे एक्सक्लुजीव्ह व्हिडिओ फुटेज आयबीएन लोकमतच्या हाती लागलं आहे. आता हे व्हिडिओ फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार आहे.

close