अवैध धंद्यासाठी डीसीपींना जबाबदार धरणार – गृहमंत्री

January 28, 2011 11:54 AM0 commentsViews: 2

28 जानेवारी

अवैध वाळू उत्खनन, तेलभेसळ सारख्या अवैध धंद्यांसाठी जिल्हास्तरावर डीसीपींना तर ग्रामीण भागात एसपीना जबाबदार धरलं जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली. हे काम अन्न व नागरी पुरवठा खात्याचं आहे. पण त्या विभागाकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे पोलीस आता या कामात उतरले आहेत असं आर आर पाटील म्हणाले. यासोबतच नागरिकांनीही पुढे येऊन याविषयची माहिती द्यावी म्हणून त्यांनी एक योजना जाहीर केली. अवैध कामाबद्दल नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यांवी. त्यांची नावं गुप्त ठेवली जातील तसेच त्यांना योग्य बक्षिसही देवू, असं ही आर आर म्हणालेत. याशिवाय स्थानिक पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यपातळीवर एक विशेष पथक पथक तयार केलं जाईल असं सुद्धा आर आर पाटील यांनी सांगितलं आहे. पुढच्या दोन दिवसात हे पथक कार्यरत होईल. या पथकाच्या सदस्यांबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात येईल आणि त्यांना राज्यात कोणत्याही ठिकाणी धाडी टाकण्याचा अधिकार असेल.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून माफियांविरोधातलं धाडसत्र सुरुच आहे. काल गुरूवार रात्रीपासून अहमदनगर, बार्शी, अकोला याठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी राज्यभरातून कालपासून पोलिसांनी अंदाजे 200 जणांना ताब्यात घेतलं.

close