मुंबईत 1000 काळ्या तेलाचे बॅरल जप्त

January 28, 2011 12:16 PM0 commentsViews: 6

28 जानेवारी

मुंबईत कलिनाजवळील कल्पना टॉकिजच्या परिसरात गुन्हे शाखेनं छापे टाकले इथे पनामा कम्पाऊंडमध्ये असलेल्या दोन गोडाउनमध्ये 1000 काळ्या तेलाचे बॅरल जप्त केले आहेत. काळ्या तेलात ग्रीस आणि सफेद पावडर टाकून हे तेल बनवण्याचं काम गेल्या कित्येक दिवसांपासून इथं सुरू होतं. या तेलाची किंमत सुमारे 40 लाख आहे. संबंधित माफिया गफारला मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ज्या पंपांवर गफारनं विक्री केली ते सील करण्याचे आदेश मुंबई गुन्हे शाखेनं दिले आहेत

close