नाना पाटेकर आणि प्रभावळकर एकत्र देऊळ सिनेमात

January 28, 2011 12:21 PM0 commentsViews: 4

28 जानेवारी

नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी आता रंगणार आहे देऊळ सिनेमात. दिविशा फिल्म्सनं देऊळ या सिनेमाची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांचं आहे. या पत्रकार परिषदेला नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी उपस्थित होते. सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाचे अनेक पैलू आहेत.सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होईल.

close