मराठा बटालियनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिम्मित कार्यक्रमाचं आयोजन

January 28, 2011 1:29 PM0 commentsViews: 6

28 जानेवारी

भारतीय सैन्य दलातील सहा मराठा बटालियन यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहेत. 1 फेब्रुवारी 1962 रोजी या बटालीयनची स्थापना करण्यात आली. या बटालीयननं अनेक युध्दात उत्तम कामगिरी केली. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी या बटालयीनच्या जवानांनी 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात अनेक रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमाची काल गुरूवारी रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी लेझीम, झांज पथकासह मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती जवानांनी सादर केल्या. तर रोशनाई बॅन्ड पथकाच्या संचलन लक्षवेधी ठरलं.

close