हिंगोलीमध्ये रॉकेल गोदामांकडे पोलिसांचं दुर्लक्ष

January 28, 2011 1:41 PM0 commentsViews: 30

28 जानेवारी

हिंगोलीमध्येही रॉकेल भेसळ प्रकरणी काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. मात्र पोलिसांचं काही मोठ्या गोदामांकडे लक्षच नाही. हिंगोलीतल्या सिद्धार्थ नगर भागातील रॉकेलच्या गोदामात सर्रासपणे रॉकेल भेसळ करण्यात येत आहे. रिक्षातून रॉकेलच्या टाक्या उतरवल्या जात आहेत. पोलिसांनी मात्र याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं. एकीकडे जिथं संपूर्ण महाराष्ट्रात तेल माफियांच्या गोदामावर धाडी टाकणं सुरू आहे. तिथं हिंगोलीत काही गोदामांकडे पोलिसांचं लक्ष नाही.या ठिकाणी त्यांनी कधीही छापा टाकला नाही.आयबीएन लोकमतची टीम घटनास्थळी पोहचल्याचे लक्षात येताच एका मुलांने भेसळ सुरू असलेल्या गोदामाला टाळं ठोकलं.

close