सिनेसमीक्षक अशोक राणे दिग्दर्शकाच्या भूमिकेत

November 4, 2008 6:46 AM0 commentsViews: 6

4 नोव्हेंबर , मुंबई रचना सकपाळविवाहसंस्थेकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न समाजात नेहमीच होत असतो. त्याच व्यवस्थेला सिनेमाच्या दृष्टिकोनातून सिनेसमीक्षक अशोक राणे यांनी दाखण्याचा प्रयत्न करतआहे. सिनेसमीक्षक अशोक राणे दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचं नाव आहे 'कथा तिच्या लग्नाची'. या सिनेमाचं शुटिंग मुंबईत सुरू आहे. लग्न स्त्रीला काय देतं हा प्रश्न 'कथा तिच्या लग्नाची' या सिनेमात मांडला गेला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अशोक राणे स्वत: करत आहेतच पण त्या सिनेमाची कथा पटकथाही त्यांचीच आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत मधु कांबीकर आहे आणि त्यांची फक्कड लावणीही पाहायला मिळणार आहे. सुलभा देशपांडे, दीपा परब, सुबोध भावे अशी स्टारकास्ट मंडळीही या सिनेमात आहेत. त्यामुळं आपल्याच सिनेमाच्या समीक्षेबद्दल अशोक राणे एकदम बिनधास्त आहेत. सिनेमा जानेवारीत रिलीज होणार आहे.

close