इशरत जहाँ फेक एन्काऊंटर होतं असं ऍफिडेव्हिट कोर्टात दाखल

January 28, 2011 2:07 PM0 commentsViews: 5

28 जानेवारी

इशरत जहाँ एन्काऊंटर हे फेक एन्काऊंटर होतं असं ऍफिडेव्हिट सतीश वर्मानीं कोर्टात दाखल केलं. सतीश वर्मा हे विशेष तपास टीमचे सदस्य आहेत. तसेच याप्रकरणी 14 पोलीस अधिकारी आणि 7 आयपीएस अधिकार्‍यांना ऍफिडेव्हिटमध्ये आरोपी ठरवण्यात आलं आहे.आतापर्यंत झालेल्या तपासात इशरत जहाँ एन्काउंटर हे फेक असल्याचं पुढं आल्याचं वर्मा यांनी दाखल केलेल्या ऍफिडेव्हिटमध्ये म्हटलं आहे. तसेच आतापर्यंत कर्नेल सिंग यांनी केलेल्या तपासावरही वर्मा यांनी शंका व्यक्त केली आहे. इशरत जहाँ प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष तपास टीमचे प्रमुख आहेत.

close