‘बॅडमिंटन फॉर्टी फाय’ या संस्थेला 25 वर्ष पूर्ण

January 28, 2011 2:37 PM0 commentsViews: 9

28 जानेवारी

बॅडमिंटन खेळातअनेक स्टार खेळाडू घडवणार्‍या 'बॅडमिंटन फॉर्टी फाय' या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली. या रौप्यमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून आघाडी बॅडमिंटनपटूंचा सत्कार करण्याची घोषणा आज संस्थेनं केली. यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, अपर्णा पोपट, आणि कोच पुलेला गोपीचंद यांचा समावेश आहे. 5 फेब्रुवारीला मुंबईत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय 3 ते 6 फेब्रुवारीदरम्यान बिर्ला मेमोरियल मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे.

close