चंदन तस्करांचा पोलिसांवर हल्ला

January 28, 2011 3:37 PM0 commentsViews: 1

28 जानेवारी

सोनवणे यांच्या हत्येला दोन दिवस उलटत नाही तोच नांदेड जिल्हातील पोलिसांवर चंदन तस्करांनी कोयत्यानं हल्ला केल्याची घटना आज घडली आहे. अर्धापूर तालुक्यातील पाटनूर जंगलात ही घटना घडली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. या जंगलात चंदन तस्करी होत असल्याची माहिती बारड पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस जंगलात दाखल झाले. मात्र दबा धरुन बसलेल्या तस्करांनी पोलिसांवर कोयत्यानं वार केला. आणि घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी पोलिसांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

close